७ वी खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची पदक सप्‍तमी !

27
Khelo India Youth game 2025
७ वी खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची पदक सप्‍तमी !

Khelo India Youth Game 2025: जलतरणात सलग दुसऱ्यांदा आदिती हेगडेने सुवर्णपदकाची लुट करीत ७व्‍या खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्रासाठी पदकाचे खाते उघडले. आदितीच्‍या १ सुवर्णासह १ रौप्‍य व ४ कांस्य पदकाची कमाई करीत महाराष्टाने आज पदकाची सप्‍तमी साजरी केली.

गया शहरातील बीआयपीएआरडीच्‍या जलतरणात तलावावर अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्‍या जलतरणपटूंनी पदकांची लयलूट केली. आदिती हेगडेने १ सुवर्ण,१ कांस्य, समाईरा मल्‍होत्राने १ रौप्‍य तर शुभम जोशी, झारा बक्षी, वेदांत तांदळे, रूतुजा राजाज्ञाने यांनी अनुक्रमे कांस्य पदके जिंकून दिवस गाजविला.

मुलींच्‍या २०० मीटर फ्रीस्‍टाईल प्रकारात मुंबईच्‍या आदिती हेगडे २.०९.५१ वेळेत शर्यत पूर्ण करून महाराष्ट्रासाठी स्‍पर्धेतील पहिले पदक जिंकले. चुरशीच्‍या शर्यतीत ७ शतांश सेकंदाने दिल्‍लीच्‍या तितिक्षा रावतला मागे टाकून आदितीने बाजी मारली. ८०० मीट फ्रीस्‍टाईल प्रकारात आदितीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आदितीचे खेलो इंडिया स्‍पर्धेतील हे ६ वे पदक आहे.गत तामिळनाडू स्‍पर्धेत तीने पदकाचा चौकार झळकविला होता, मुंबईतील खेलो इंडिया ॲकडमीत ती सराव करत असते.

मुलींच्‍या १०० मीटर .ब्रिस्‍टस्‍ट्रोक प्रकरात महाराष्ट्राचा डबल धमाका पहाण्यास मिळाला. मुंबईच्‍या समाईरा मल्‍होत्रा व झारा बक्षी यांनी अनुक्रम रूपेरी व कांस्य पदकाला गवसणी घातली. कर्नाटकच्‍या मानवी वर्माने सुवर्णपदक जिंकले. मुलांच्‍या १०० मीटर ब्रिस्‍टस्‍ट्रोक प्रकरात ठाणेच्‍या शुभम जोशीने कांस्यपदकाची कमाई केली. कर्नाटकच्‍या क्रीश सुकुमारने सुवर्ण पदकां पल्‍ला पार केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी,दिनेश वढणे