महाराष्ट्रात कारोना चा पहिला बळी

मुंबई: कारोना चा महाराष्ट्रात पहिला बळी केला आहे. मुंबईमधील कस्तुरबा गांधी रुग्णालयात ही घटना समोर आली आहे. मृत व्यक्ती ही ६३ वर्षाचा असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत कोरोनामुळें जेवढे बळी गेले आहेत त्यात वृध्द व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे वृद्ध व्यक्तींनी या बाबत विशेष काळजी घेतली पाहिजे.

सध्यातरी या व्यक्तीची माहिती प्रशासनाने सांगितली नाही. ही घटना सकाळी घडली असल्याचे सांगितले जातं आहे. वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना या विषाणूची लागण लगेच होत आहे. तसेच या व्यक्तीच्या बाबतीत झाले असेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

जगातील ६००० हून अधिक लोकांचा बळी घेणारा कोरोना विषाणू विनाशक होण्याचे नाव घेत नाही. देशात कोरोनाची प्रकरणे दररोज वाढत आहेत. २४ तासांत, १२ नवीन कोरोना रुग्णांची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत देशभरात १२८ प्रकरणे नोंदली गेली असून यामध्ये महाराष्ट्रातील तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये कोरोना विषाणूची ५ नवीन प्रकरणे आल्यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण ३९ वर पोहोचले आहेत. मुंबई पोलिसांनी कलम १४४ लागू केला आहे, आतापर्यंत पुण्यात सर्वाधिक १६ रुग्ण सापडले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा