महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार.

राज्यात चालू असलेल्या सत्तास्थापनेच्या लपंडाव मध्ये आज सर्वात मोठा खुलासा झाला आहे. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन केले आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. तर अजित पवार हे महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून रुजू झाले आहेत.
आज पहाटे आठ च्या दरम्यान राज भवनामध्ये राज्यपालांचा समक्ष दोन्ही नेत्यांनी शपथ विधी संपन्न केला. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी खेळी मानली जाऊ शकते. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सर्वात मोठे सत्तास्थापनेचे समीकरण मानले जाईल. आज संध्याकाळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तास्थापनेचा दावा करणार होते या सर्वांमध्ये अजित पवार यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे का, हा मोठा प्रश्न महाराष्ट्रातील राजकारण समोर उभा आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये समजेलच की याच्यामागे राष्ट्रवादीचा किती पाठिंबा आहे, की फक्त अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा