महाराष्ट्रातील सर्वाधिकार पवारांकडे- सोनिया गांधी

मुंबई: भाजप-शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून चाललेला वाद अजूनही संपुष्टात आलेला नाही. शिवसेनेकडून असे सांगण्यात आले आहे की जोपर्यंत भाजप ठरलेल्या वचनांवर काम करत नाही तोपर्यंत कोणतीही बोलणी होणार नाही. तर दुसरीकडे राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी रणनीती ठरवण्यासाठी चे पूर्ण अधिकार शरद पवार यांच्याकडे राहतील असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले असल्याचे समजते.
भाजप-शिवसेना यांचे सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे सरकार स्थापन केले जावे का, याबाबतचा सोनिया गांधी यांचा विचार जाणून घेण्याचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केला. यावर मतप्रदर्शन करताना सोनिया गांधी यांनी राज्यात असा कोणताही राजकीय निर्णय घेण्याचा झाल्यास याबाबत शरद पवार यांचे मत जाणून घ्या तसेच त्यांच्या सल्ल्याने पुढे जा असे सांगितले असल्याचे समजते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व रणनीती शरद पवार यांच्याकडे असल्याचे समजते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा