मुंबई: काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यात शिवसेना अपयशी ठरली आहे. शिवसेनेला २४ तासांची मुदत राज्यपालांकडून मिळाली होती तसे शिवसेनेकडून प्रयत्नही करण्यात आले. ऐन वेळेला काँग्रेसकडून पाठिंबा न मिळाल्यामुळे शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करू शकली नाही. शिवसेनेकडून राज्यपालांना वेळ वाढवून मिळण्यास विनंती केली गेली परंतु राज्यपालांनी ते नाकारले. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वेगळे वळण आले आहे. महाराष्ट्र राष्ट्रपती शासनाच्या दिशेने चालले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून पत्रात असे म्हटले आहे की आम्ही याविषयी शिवसेनेसोबत चर्चा केली होती व यानंतर यावर चर्चा होईल.