कर्जत, दि. १८ जुलै २०२०: महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज (शास्त्र) शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून ३१२ विद्यार्थ्यांपैकी डिस्टिंक्शन मध्ये ४९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये २१३ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणी मध्ये ५० विद्यार्थी आणि तृतीय श्रेणी मध्ये ० विद्यार्थी आहेत.
प्रथम= कु.गदादे नुतन संजय (९०.३०%)
द्वितीय= कु. गदादे शितल लालासाहेब (८५.८४%)
तृतीय= कु. देशमुख वेदिका भालचंद्र (८४.९२%)
चतुर्थ = पावसे गणेश दत्तू (८४.७६%)
पाचवा= बदे सुरज संजय (८४%)
तसेच गणित व कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळालेले विद्यार्थी आहेत.
महात्मा गांधी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक (शास्त्र) व तांत्रिक विद्यालय कर्जत.
एच. एस. सी. निकाल १००% लागला असून विषयनिहाय प्रथम आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे
१) गणित -१०० पैकी १०० गुण मिळालेले विद्यार्थी = पावसे गणेश दत्तू
२) कृषी विज्ञान व तंत्रज्ञान १०० पैकी १०० गुण मिळालेले विद्यार्थी=
माने रिया रामदास
धुमाळ प्रीती शिवाजी
शिंदे पृथ्वीराज महादेव
३) मराठीत प्रथम ९३ गुण
गदादे नुतन संजय
४) इंग्रजीत प्रथम ८२ गुण
गदादे नुतन संजय
५) भौतिकशास्त्र प्रथम ९३ गुण
बदे सुरज संजय
६) रसायनशास्त्र प्रथम ९१ गुण
धुमाळ प्रीती शिवाजी
७) जीवशास्त्र प्रथम ९७ गुण
देशमुख वेदिका भालचंद्र
या सर्व गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राजेंद्र फाळके, जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य बापूराव धांडे, सहसचिव नागपुरे, उत्तर विभाग अहमदनगरचे सहाय्यक विभागीय अधिकारी सरदार व सहाय्यक विभागीय अधिकारी खंडेराव शेंडगे, विद्यालयाचे माजी प्राचार्य खेतमाळस, प्रभारी प्राचार्य संतोष पोटरे, तसेच ज्यू. कॉलेज विभाग प्रमुख सौ.पठाण मॅडम, माजी विद्यार्थी संघ (आस्था), माजी रयत सेवक तसेच पंचक्रोशीतील शाळेवर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष