मुंबई, २० नोव्हेंबर २०२०: महाविकास आघाडीतर्फे पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून पाच अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत असल्याचं संयुक्त जाहीर प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होत आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेकडून श्रीकांत देशपांडे, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अरुण लाड, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण, पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रा. जयंत आसगांवकर तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे.
या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे सुभाष देसाई आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
नागपूर:
अभिजित वंजारी (काँग्रेस) vs संदीप जोशी (भाजप) vs राहुल वानखेडे (वंचित) vs नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार)
औरंगाबाद:
शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित) vs सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) vs ईश्वर मुंडे (राष्ट्रवादी)
अमरावती:
श्रीकांत देशपांडे (शिवसेना) vs नितीन धांडे vs दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) vs संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समिती कडून (भाजपा माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांची बहीण ) vs प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )
पुणे:
जयंत आसगावकर (काँग्रेस) vs उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे