आशिष शेलारांच्या आरोपावर महाविकास आघाडीची पहिली प्रतिक्रिया

बीड १७ सप्टेंबर २०२२ : वेदांता आणि फॉक्सकॉन या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने टक्केवारी मागितली होती? असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते अशीच शेलार यांनी केला आहे. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे.

अजित पवार बीडमध्ये वृत्तवाहिनी माध्यमांशी बोलताना सांगतात की, आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेले आरोप हे खोटे आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेला कसा? या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ही त्यावेळी त्यांनी केली आहे. यादरम्यान जिल्ह्यांना पालकमंत्री न नेमल्याच्या कारणावरून त्यांनी सरकारला खडसावले आहे. तसेच अजित पवार बोलतात की, वेदांत हा प्रकल्प हा महाराष्ट्रात आला पाहिजे आणि राज्य सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी पूर्ण ताकद लावली पाहिजे.

महाविकास आघाडीच्या काळातील प्रकल्पांना स्थगिती देणे योग्य आहे. पण, आरोप प्रत्यारोप केल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार नाहीत. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून येण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न करायचे ते केले पाहिजे आणि हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणला पाहिजे, असे पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे.

वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प दीड लाख कोटीचा होता. पण महाविकास आघाडीने कंपनीकडे किती टक्के मागितले होते. ठाकरे सरकारने या कंपनीकडे १० टक्के रक्कम मागितली की पालिकेच्या नियमानुसार रक्कम मागितली, असा सवाल आणि आरोप आशिष शेलार यांनी केला होता.

पण, हा आरोप महा विकास आघाडीच्या नेत्यांकडून फेटाळून लावला आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात परत आणणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण, वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पांनी गुजरातला मोठा फायदा होणार असून महाराष्ट्राला मोठा फटका बसणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा