महाविकासआघाडीला मनसे देणार पाठींबा?

मुंबई : राज्यात आता महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या महाविकासआघाडीबाबत मनसेने जाणार का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. मनसेने सध्यातरी कोणतीच भूमिका घेतलेली नाही. मात्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नेहमी शेतकऱ्यांचा प्रश्न, बुलेट ट्रेन, नाणार यांसारख्या प्रकल्पांना विरोध दर्शवला होता, तो विरोध विधानसभेत देखील करणार असल्याचे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे.

राजू पाटील यांना सरकार स्थापन होणार आहे. यामध्ये मनसेला स्थान मिळणार का असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यासंबंधित निर्णय घेतील असं त्यांनी सांगितले आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेची युती झाली नव्हती. मात्र काही जागांवर एकमेकांना सहकार्य केले असल्याचे देखील राजू पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक झालेली मनसे आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा