मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज (दि.३०) विधानसभेत मांडला जाणार आहे.
विश्वासदर्शक ठरावासाठी दोन दिवसांचे विशेष विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे.
शिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यानुसार हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कामकाजात विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात येणार आहे.













































