गोल पोस्ट राजकारण महाविकासआघाडी आजच करणार सत्तास्थापनेचा दावा?

महाविकासआघाडी आजच करणार सत्तास्थापनेचा दावा?

मुंबई : अनेक दिवसांपासून सत्ता स्थापनेच्या घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकांनंतर “महाविकासआघाडी” कडून आजच सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
याशिवाय २६ नोव्हेंबरला संविधान दिनाचा मुहूर्त साधत शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काल उशीरा रात्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली होती. बैठकांमध्ये सत्तेचा फॉर्मुला देखील ठरल्याचं सूत्रांची माहिती आहे.
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. सरकार स्थापनेवर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाशिवआघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत होणार आहे.

या बैठकीला काँग्रेसकडून के.सी. वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी २ वाजता महाविकास आघाडीची अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. नवे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया आजच सुरू करण्यात येण्याची चिन्ह आहेत.

महाविकासआघाडीच्या बैठकीआधी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची आज दुपारी १ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षाचा नेता निवडला जाईल. सर्व आमदारांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत आहेत. विधीमंडळ पक्षनेते पदासाठी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची नाव चर्चेत आहे. दिल्लीवरून येत असलेले निरीक्षक पक्षाच्या आमदारांची मतं जाणून घेऊन त्याचा अहवाल दिल्लीला दिला जाणार आहे.

असा असणार महाशिवआघाडीचा सत्तेचा फॉर्मम्युला:

शिवसेना: ११ कॅबिनेट, ५ राज्यमंत्रीपदे( मुख्यमंत्रीपद)
राष्ट्रवादी: ११कॅबिनेट, ४राज्यमंत्री (उपमुख्यमंत्रीपद)
काँग्रेस: ९कॅबिनेट, ३ राज्यमंत्रीपदे(उपमुख्यमंत्रीपद(

१६:१५:१२ या फॉर्म्युल्यावर सहमती झाली असल्याची माहिती मिळत आहे.

महामंडळ:
शिवसेना:२७
राष्ट्रवादी: २५
काँग्रेस: २५

सिद्धिविनायक ट्रस्ट: शिवसेना
शिर्डी देवस्थान: काँग्रेस-राष्ट्रवादी

error: Content is protected !!
Exit mobile version