नवी दिल्ली ४ मे २०२३ : आमिर खान हा देशातील एक असा कलाकार आहे की, जो सत्यपरिस्थितीवर आपली सडेतोड भूमिका मांडत असतो. आमिर खानने आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ट्वीट केल्यास अथवा जाहीरपणे आपली भुमिका मांडल्यास त्यांच्या लढ्याला बळकटी येईल,असे माजी पैलवान आणि गीता-बबिता फोगाट यांचे वडील महावीर फोगाट यांनी आवाहन केले आहे.
‘दंगल’ या चित्रपटात आमिर खानने महावीर फोगाटची भूमिका साकारली होती. २०१४ मध्ये ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात फोगाट बहिणींची मुलाखत ही आमिर खानने घेतली होती. आमिर ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या १०० व्या भागाला हजेरी लावली होती. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्याहि ‘मनातील बात’ आमिर कडून देशभरात पोहचावी असा महावीर फोगाट यांचा प्रयत्न असल्याचे कळते.
बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनावर आमिरने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
महावीर यांनी सांगितले कि, आम्ही सरकारच्या विरोधात नाही तर ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आहोत, कुस्तीपटूच्या लैंगिक छळाचा आरोप असल्याने ब्रिजभूषण यांच्यावर त्वरित कारवाई होणे अधिक महत्त्वाचे आहे. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंसाठी करो किंवा मरो अशी परिस्थिती आहे. न्याय मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करू, या लढ्यात आम्ही सगळे सोबत आहोत. बबिता फोगाटही या लढ्याचा एक भाग आहे. देशभरातील सर्वच स्तरातून आम्हाला चांगला पाठिंबा मिळत असून गरज पडल्यास आम्ही दिल्लीलाही घेराव घालू.
न्यूज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.