हानोइ: भारतीय महिलांनी आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या फुटबॉल लढतीत बुधवारी यजमान व्हिएतनाम ला एक-एक असे बरोबरीत रोखले. सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला थाई थाओ हिने गोल करून व्हिएतनाम ला आघाडीवर नेले होते. नॅशनल ट्रेनिंग सेंटर च्या मैदानावर झालेल्या सामन्यात त्यानंतर भारतीय महिलांनी जोरदार प्रति आक्रमण करून ५७ व्या मिनिटाला बरोबरी साधणारा गोल केला. भारतीय महिलांना यापूर्वी पहिल्या सामन्यात शून्य–तीन असा पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंना गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या, पण त्याचा फायदा उठवण्यात त्यांना अपयश आले.