गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे महिलांसाठी मोठी संधी! ‘स्वयंसिद्धी’ योजनेत १० लाख कर्ज, १२% व्याज परतावा

महिलांसाठी मोठी संधी! ‘स्वयंसिद्धी’ योजनेत १० लाख कर्ज, १२% व्याज परतावा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना’ अत्यंत प्रभावी ठरत आहे. इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू आणि परित्यक्ता महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत महिलांना घरगुती उद्योग, उत्पादन केंद्र किंवा सेवा क्षेत्रातील व्यवसायांसाठी १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाते.

या कर्जावर महामंडळामार्फत १२ टक्के व्याज परतावा थेट महिलांच्या बँक खात्यात वार्षिक पद्धतीने जमा होतो. यामुळे महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार हून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्या आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version