गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्यात ‘साथरोग नियंत्रण केंद्र’ कार्यान्वित रोगांवर ‘वैज्ञानिक’ वॉच

पुण्यात ‘साथरोग नियंत्रण केंद्र’ कार्यान्वित रोगांवर ‘वैज्ञानिक’ वॉच

शहरात स्वाईन फ्लू, कोरोना आणि जीबीएससारख्या साथरोगांच्या उद्रेकानंतर पुणे महापालिकेने ‘महानगरीय सर्वेक्षण केंद्र’ (MSU) कार्यान्वित केले आहे. रोगांचा प्रसार रोखण्यासाठी त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे बदलते हवामान, दूषित पाणी आणि शहरी जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या संसर्गजन्य आजारांच्या धोक्यावर वेळेत लक्ष ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली विविध सरकारी आणि आरोग्य विभागांच्या समन्वयातून हे केंद्र उभारले गेले आहे. आयुक्त राम यांनी MSU ला ‘ऐतिहासिक पाऊल’ म्हटले असून, यामुळे वेळेवर माहिती संकलन आणि त्यावर आधारित उपाययोजना त्वरित करता येतील. यामुळे पुणे शहराच्या आरोग्य यंत्रणेला वैज्ञानिक व तांत्रिक बळकटी मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version