गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पिंपरी-चिंचवड पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’; चोरट्यांचे ‘सर्व्हर डाउन

पिंपरी-चिंचवड पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’; चोरट्यांचे ‘सर्व्हर डाउन

एटीएम मशीन फोडून लाखोंची रोकड लंपास करणाऱ्या टोळ्यांच्या ‘नेटवर्क’ला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांच्या प्रभावी कारवाईने अक्षरशः ‘क्रॅश’ केले आहे. पोलिसांचा नियोजनबद्ध तपास, विशेष पथके आणि सायबर तंत्रज्ञानाचा अचूक वापर यामुळे गुन्हेगारांचे ‘सर्व्हर डाउन’ झाले आहेत.

माजी घटनांमध्ये जिलेटिन आणि गॅस कटर वापरून होणाऱ्या चोरींना आता प्रभावी आळा बसला आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या निर्देशानुसार, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या विश्लेषणातून अनेक टोळ्या उघडकीस आल्या. २०२१ मध्ये ३१ असलेल्या एटीएम फोडींच्या घटना, ‘अचूक सिक्युरिटी सिस्टिम’मुळे लक्षणीयरित्या घटल्या आहेत. २०२५ मध्ये (सप्टेंबरपर्यंत) केवळ चार घटनांची नोंद झाली असून, शहरात चोरी आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version