महिला तहसीलदार कार्यालयातच जिवंत जाळले

तेलंगणा : तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात महिला तहसीलदारास कार्यालयातच जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विजया रेड्डी असे मृत महिला तहसीलदाराचे नाव आहे.
रेड्डी कार्यालयात असताना दुपारी हल्लेखोर त्यांच्या केबिनमध्ये गेला. यानंतर दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली. त्यानंतर आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर त्यांना जिवंत जाळले. पेटविल्यानंतर महिला अधिकारी किंकाळतच कार्यालयाबाहेर आल्या. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या दोघा सहकार्‍यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, रेड्डी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे घटनास्थळावरच त्यांचा मृत्यू झाला.
त्यांना वाचविताना दोघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, घटनास्थळावरून पसार झालेला सुरेश नामक हल्लेखोर सायंकाळी पोलिसांना शरण आला. जमिनीच्या व्यवहाराबाबत दुपारी तो तहसीलदारांना भेटण्यास गेला होता, असे समजते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा