नवी दिल्ली : सात वर्षांपुर्वी दिल्लीतील निर्भया प्रकरणाने संपुर्ण देश हदरला होता. आता हैदराबादमध्ये देखील पुन्हा एकदा महिला डॉक्टरबरोबर तशीच घटना घडली आहे. या घटनेमुळे देशभरातील नागरिकांमध्ये आक्रोश दिसून येत आहे. महिलांच्या सुरक्षेला लक्षात घेऊन २०१४ मध्ये हलकी निर्भीक रिव्हॉल्व्हर बाजारात आणण्यात आली होती.याबाबत एका संकेस्थळाने बातमी प्रसिद्ध केली आहे.
निर्भया प्रकरणाने प्रेरित असल्याने या रिव्हॉल्व्हरचे नाव निर्भीक ठेवण्यात आले आहे. १८ मार्च २०१४ ला कानपूरमध्ये या रिव्हॉल्व्हरचे उद्घाटन करण्यात आले होते.
जुलैपर्यंत २५०० रिवॉल्वर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये विकल्या गेल्या आहेत. या रिवॉल्वरचे वजन ५०० ग्रॅम आहे. तर सर्वसामान्य रिव्हॉल्व्हरचे वजन ७०० ग्रॅम इतके असते.
या रिवॉल्वरची किंमत १.२० लाख रुपये आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर याची किंमत वाढून १.४० लाख रुपये इतकी झाली आहे.
निर्भीकद्वारे सहज १० मीटरच्या भागात निशाणा साधता येतो. मात्र ऑर्डिनेंस फॅक्ट्रीने दावा केला आहे की, रिवॉल्वर १५ मीटर रेंज आणि ०.३२ (७.६५ मिमी) बोर कॅलिबरसोबत येते. निर्भीकचे टायटेनियम एलॉय मेटलपासून बनविण्यात आलेले आहे. ज्यामुळे गंज लागत नाही. महिला आपल्या हँडबँगमध्ये ही रिव्हॉल्व्हर सहज बाळगू शकतात.