लखनऊ, दि. १३ जून २०२०: उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांनी राज्यात दलितांवरिल अत्याचारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. जौनपूर आणि आझमगडमधील दलितांवरील अत्याचाराबाबत मायावतींनी मौन फोडले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की त्यांच्या धर्म आणि जातीची पर्वा न करता त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी.
मायावतींनी ट्वीट केले की, ‘आझमगड, कानपूर किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातील खासकरुन दलित महिला व मुलींच्या अत्याचाराविषयी किंवा अन्य कोणत्याही जाती-धर्माचा छळ होण्याच्या बाबतीत असो अशा सर्व घटनांची निंदा केली जाईल. असे अत्याचार करणारा हा कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा कोणत्याही पक्षांमधील मोठा नेता असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. बसपा कडून ही चेतावनी समजली जावी.’
बसप प्रमुख म्हणाले की, खासकरुन आजमगडमध्ये दलित मुलीचा छळ केल्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी उशिरा का होईना कारवाई केली ही चांगली गोष्ट आहे. परंतू यापुढे महिलांवरील अत्याचारावर कारवाई वेळेत होणे अपेक्षित आहे. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आजमगडमध्ये दलित किशोरवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी सीएम योगी आदित्यनाथ यांनी आरोपी परवेज, फैजान, नूरलाम, सदरे आलम यांच्यासह १२ जणांना अटक केली आणि ७ फरार आरोपींवर त्वरित एनएसए लावण्याचे आदेश दिले. फरार आरोपींवर बक्षीस जाहीर करण्याबरोबरच निष्काळजीपणा करणाऱ्या SHO वर कारवाईचे आदेश दिले. योगी आदित्यनाथ यांनी उशीर का होईना पण योग्य कारवाई केल्याबद्दल मायावती यांनी हे ट्विट केले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी