गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला अटक

ठाणे : सिटीस्कॅनसाठी आलेल्या एका महिलेवर टेक्निशियनने हॉस्पिटलमध्येच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उल्हासनगर येथे समोर आली आहे. या प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३५ वय असलेली एक महिला उल्हासनगरमधील एका हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन करण्यासाठी आली होती. मात्र, सिटी स्कॅन करणाऱ्या टेक्निशियनने पिडीत महिलेवर लैंगिक अत्याचार केला अशी तक्रार पिडीत महिलेने केली. जिन्स थॉमस असे आरोपीचे नाव आहे. तसेच जिन्स थॉमस विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्याला अटक देखील केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असून २७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version