महिन्यातुन एका गड-किल्ले-दुर्गावारी करा, रोग आणि आजारांतुन बाहेर पडा.

दुर्ग सर करणा-या मावळ्यांना श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती पोट आणि मानसिक आजार होणार नाहीत.
आधुनिक वैद्यकशास्त्रात याचे संदर्भ आढळत नसतील असे समजुन याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः एकदा खात्री करा.
मग तुम्ही स्वतःच या गोष्टीचा प्रचार कराल.

श्वसन – गडावर खालुन वर चढताना श्वासांची प्रक्रिया जलद होते,
त्यामुळे पुर्ण श्वासोच्छ्वासाची क्रिया घडते.
श्वासोच्छ्वासाच्या क्रियेला चालना मिळते.

रक्तप्रवाह – श्वासोच्छ्वास जलद झाल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, रक्ताभिसरणाची क्रिया जलद होते.
शिरांतील, नसांतील ब्लॉकेज निघतात.
महिन्याला दुर्गाची वारी
ब्लड-प्रेशरचा आजार दुर करी..!

गुडघे – पायांवर ताण येतो,
सर्व स्नायु उत्तेजित होतात.

छाती – वर चढताना दम भरल्याने फुफ्फुसे पुर्ण क्षमतेएवढी हवा आत घेतात आणि बाहेर सोडतात.

पोट – गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द चालताना डीहाइड्रेशन मुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते, पण गडावर गेल्यावर झरा, तळी, पावसाचे अतिशुद्ध पाणी पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते,
दैनंदिन दुषित पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार दुर व्हायला हातभार लागतो.
शरीरावरील चरबी कमी होते.

मानसिक आजार – रोजच्या धकाधकीच्या जीवनातील ताण-तणाव हे गडावरील मनाला प्रसन्न करणारे वातावरण, निसर्गाचे मुक्तहस्त चित्रण, निसर्गाचे रंग-रुप पाहुन दुर होतात.
गडावरील सौंदर्य पाहुन भारलेले मन घेऊनच खाली आल्याशिवाय आपण राहत नाही.
मनाची प्रसन्नता वाढते आणि ताण-तणाव निवळायला मदत होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा