उंडवडी सुपे येथे क्रॅपसॅप अंतर्गत मका पिकावरील शेतीशाळा संपन्न

बारामती, दि. २७ जून २०२० : बारामती शासन कृषि विभागामार्फत क्रॅपसॅप अंतर्गत मका पिकाची शेतकरी शेतीशाळा उंडवडी सुपे येथे घेण्यात आली. शेती शाळेमध्ये मका व बाजरी बियाणे बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक कृषि सहाय्यक माधुरी पवार यांनी करून दाखवले. हुमणी किडनियंत्रणासाठी प्रकाश सापळा मध्ये पडलेले हुमणी भुंगेची पहाणी केली तसेच त्याचा जिवनक्रमाची माहिती शेतक-यांना सोप्यापध्दतीने समजावून सांगितले.

मका पिकामध्येही प्रकाश सापळाचा उपयोगाबद्दलची माहिती शेतक-यांना सांगण्यात आलो. यावेळी पंचायत समिती सदस्य शारदाताई खराडे, मंडळ कृषि अधिकारी लिंबरकर, कृषि पर्यवेक्षक जाधव, कृषि सहाय्यक एस.पी.पिसे तसेच गावातील पुरुष व महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थित शतक-यांचे कृषि पर्यवेक्षक एस.बी.पवार यांनी आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा