पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी मका खरेदी हमी भाव केंद्र सुरू : माने

इंदापूर, दि.२ जून २०२०: पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात राज्य शासनाकडून आधारभूत दरात मका खरेदी करण्यासाठी हमी भाव केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती आ.यशवंत माने यांनी दिली आहे.

केंद्र शासनाकडून राज्य शासनाला ८ मे २०२० रोजी परवानगी दिल्यानंतर राज्यात २५ हजार मेट्रिक टन मका व १५ हजार मेट्रिक टन ज्वारी खरेदी धोरण नुकतेच जाहीर झाले होते. त्यानुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती ने मका खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र सुरू करण्या संदर्भात आ.यशवंत माने यांनी मागणी केली होती.

त्यासंदर्भात १६ मे ला न्यूज अनकट ने सविस्तर बातमी दिली होती. त्या मागणीची दखल घेऊन पुणे व सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती तसेच दौंड व सासवड तालुक्यात ऑनलाईन पध्दतीने प्रति क्विंटल १७६० रुपये हमीभाव दरात मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.अशी माहिती पुणे जिल्हा पणन अधिकारी एस.एस कदम यांनी दिली आहे.

आधीच लष्करी अळीने मक्याचे मोठे नुकसान झाले होते. त्यात मक्याला कमी प्रमाणात मिळत असलेल्या बाजार भावामुळे मका उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेले होते. यामुळे हमीभाव दरात मका खरेदी करण्यासाठी परवानगी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा