गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिकच्या घोटी देवगाव रस्त्यावर मोठा अपघात, तीन शिक्षिका जखमी

नाशिकच्या घोटी देवगाव रस्त्यावर मोठा अपघात, तीन शिक्षिका जखमी

नाशिक:२७ जूलै २०२२: नाशिक जिल्हातील घोटी देवगाव रस्त्यावर एक धक्कादायक घटना घडलीयं घोटी देवगाव रस्त्यावर अपघात झाला असून या अपघातामध्ये तीन शिक्षिका जखमी झाल्याची माहिती मिळतंय. देवगाव आश्रम शाळेतील या शिक्षिका आहेत.

आज सकाळी या शाळेमध्ये जाण्यासाठी निघाल्या असतानाच हा अपघात झालायं. याच आश्रम शाळेतील मुलीला मासिक पाळीमुळे वृक्षारोपनण करण्यास रोखण्यात आल्याचा आरोप केला होता.या तिन्ही शिक्षिका एकाच शाळेतील असून आज सकाळी शाळेमध्ये जाण्यास निघाल्यावर हा अपघात झाला आहे.

अपघातातील तिन्ही शिक्षिकेंची तब्येत स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. देवागाव आश्रम शाळेत कालच एक धक्कादायक घटना घडलीयं. शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र एका विधार्थिनीला शिक्षकांनी झाड लावण्यापासून रोखले.

तुझी पाळी सूरु आहे. तू झाड लावलंस तर ते मरेल, असे म्हणत एका शिक्षकाने वृक्षारोपण करु दिले नव्हते. या घटनेची चौकशी करण्यासाठी आज आदिवासी विभागाचे अधिकारी आश्रम शाळेत दाखल झाले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version