बारामतीत राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई

बारामती ,६ जुलै २०२० : बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क पथकाने आज सोमवारी छापा घातल्यावर ६२ लाख ७१० रुपयांचा स्पिरिटचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सुखनाम सिंग(वय.५६ रा.कोटदाना,ता.तरण जि. तरण ), दिलज्योत सिंग(रा कोठडी,ता. पुखराज )टीकमजी भार्गव दिसोरी(जि,पाली.राजस्थान, सध्या राहणार कुतवळ वस्ती,ता. बारामती) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची हकीकत अशी की राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक २ या पुण्याचे निरीक्षक यांना मिळालेल्या माहिती प्रमाणे बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथील रंगीला राजस्थान ढाब्याच्या आवारात टँकर लावून आरोपी वाहन चालक सुखनाम सिंग हा टँकर मधील अतिशुद्ध मद्यार्क चोरून त्याची ढाबा चालक भार्गव यास विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने रंगीला राजस्थान धाब्यावर छापा टाकून या भरारी पथकाने १६ चाकी टँकर क्र (एम.पी ०९ एच.जे ०२७७) सह सुमारे चाळीस हजार लिटर अतिशुद्ध मद्यार्क (स्पिरिट) प्लॅस्टिक कॅन, पाईप असा एकूण तब्बल ६२ लाख ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन विभागाच्या भरारी पथकाकडून केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत प्रसाद सुर्वे, विभागीय भरारी उप-आयुक्त, संतोष झगडे अधीक्षक, संजय जाधव, संजय पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग मार्गदर्शनाखाली अनिल बिराजदार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन पुणे, विजय मनाळे निरीक्षक दौंड विभाग, विकास थोरात दुय्यम निरीक्षक, सतीश इंगळे, प्रशांत दांंहिजे, सर्वश्री पडवळ, बी.आर.सावंत, विजय विंचुरकर, अशोक पाटील, मनिषा भोसले, केशव वामणे, अभिजीत रिसोलेकर हे सहभागी झाले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा