मोठी कारवाई; ‘लष्कर ए तैयबा’च्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा

20

जम्मू काश्मीर, २ नोव्हेंबर २०२२: जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरा व अवंतपुरा या दोन ठिकाणी खुप जोरदार चकमक झाली. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अवंतीपुरा भागात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झालाय.

अजून दोन ठिकाणी दहशतवाधी लपून बसलेले आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोएबाच्या कमांडर मुख्तार भट याचा समावेश होता. लष्कराच्या मते तो एफटी सोबत जवानांच्या शिबिरावर हल्ला करण्यासाठी जात होता.

पोलिसांनी या चकमकीनंतर एक एके-७४ रायफल व एक एके-५६ एक पिस्तूल आदी शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. लष्कर ए तोएबाचा कमांडर मुख्तार भट याचा सीआरपीएफचे एएसआय आणि दोन आरपीएफ जवानांच्या हत्येसह अनेक दहशतवादी कारवाईत सहभाग होता असे सांगितले आहे.

या आगोदर म्हणजे सोमवारी कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरच्या जुमागुंड भागात जवानांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा केला होता. यामुळं अजूनही पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी कुरापती सुरुच आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा