मजूर कोणाची वैयक्तिक संपत्ती नाहीत: राहुल गांधी

नवी दिल्ली, दि. २६ मे २०२०: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी प्रेस कॉन्फरन्स घेत मोदी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी लॉकडाऊन विफल झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की, मोदींनी दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन सुरू करताना सांगितले होते की, आपण केवळ २१ दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. परंतू आता ६० दिवस होत आले आहेत तरीही लॉकडाऊन चालू आहे. २१ दिवसात आपण कोरोना व्हायरसला हरवू असे वक्तव्य त्यांनी केले होते. परंतू आता ६० दिवस झाले आहेत आणि लॉकडाऊन उठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन पूर्णपणे विफल झाले आहे.

राहुल गांधी म्हणाले की, लॉकडाऊन घोषित झाल्यापासून लॉकडाऊनच्या चार पायऱ्या पूर्ण झाल्या आहेत. नरेंद्र मोदींना यातून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण विफल झाल्या आहेत. त्यामुळे आता आपण सरकारला प्रश्न विचारला पाहिजे की सरकार आता पुढे काय करणार आहे. कारण लॉकडाऊन पूर्णपणे फेल गेले आहे. सुरुवातीला नरेंद्रमोदी फ्रंट फूट वर होते परंतू आता ते बॅकफुटवर आले आहे. सध्याची परिस्थिती बघता त्यांनी पुन्हा फ्रंट फूट वर गेले पाहिजे.

मजूर कोणाची वैयक्तिक संपत्ती नाहीत

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मजुरांवर वक्तव्य केले होते की आता मजूरांना कामासाठी बोलवायचे असेल तर परवानगी घ्यावी लागेल. यावर राहुल गांधी म्हटले की मजूर कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. त्यांना जिथे काम करायचे आहे तिथे काम करू शकतात व आपले पोट भरू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा