गोल पोस्ट स्पॉटलाइट मालिका विश्‍व माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर ….

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर ….

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२०: मालिकेच्या ऑडिशनला जाताना तिच्या बाबांनी “एक प्रयत्न कर, आपणास हवे ते क्षेत्र आपली वाट पहात असतंच,” असं म्हणतं तिला या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. जय मल्हार या मालिकेतून बानू या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री ईशा केसकरवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले.

सोशल मिडियावर ईशानं एक दुःखद पोस्ट करून हि बातमी शेयर केली. वडिल हे नेहमीच मुलींच्या ह्रदयातील एक महत्त्वाचा कप्पा आणि जवळची व्यक्ती असतात. ईशाच्याही सर्वात जवळील व्यक्ती म्हणजे तिचे बाबा होते. वडिलांच्या अश्या अकाली जाण्याने ईशाला जबरदस्त धक्का बसला आसून ती या दुखातुन अजून ही सावरलेली नाही. सध्या ती कोणासोबतही बोलण्याच्या मनस्थितीत नाही असे तिच्या जवळच्या एका मित्राने सांगितले.

सोशल मिडियावर ईशानं वडिलांचा एक फोटो शेयर केला आसून त्यामधे तिच्या वडिलांची जन्म तारीख आणि मृत्यू तारीख तिने लिहिली आहे. २४ नोव्हेंबर रोजी चैतन्य केसकर यांनी आखेरचा श्वास घेतला. सध्या ईशा ही “माझ्या नवऱ्याची बायको” कार्यक्रमात शनयाचे पात्र करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version