औरंगाबाद, १५ जानेवारी २०२३ : नव्या वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा सण महिलावर्गासाठी अतिशय जिवहाळ्याचा सण आहे. महाराष्ट्रामध्ये याला मकर संक्रांत, गुजरातमध्ये उत्तरायण, तर दक्षिण भारतामध्ये पोंगल
या नावाने हा सण ओळखला जातो.
औरंगाबद येथील गजानन महाराज मंदिरात आज सकाळपासून महिलांनी मंदिरात येत एकमेकींना हळदी – कुंकू लावून वाणाची देवाणघेवाण केली. ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत एकमेकींना शुभेच्छा दिल्या. गजनान मंदिरासह शहरातील विविध मंदिरांत जाऊन दर्शन घेऊन मकर संक्रांत साजरी केली.
नव्या वर्षात नवी आशा-आकांक्षा उरी बाळगून केलेली सुरवात महिला मैत्रिणींसोबत साजरी करताना या सणाचं औचित्य साधत मकर संक्रांतीच्या सणानिमित्त घरोघरी महिलांना एकत्र आणण्यासाठी त्यांना हळदी-कुंकू आणि वाण देण्याचा कार्यक्रम केला जातो. साधारण हा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही आयोजित केला जाऊ शकतो. यंदा मकर संक्रांत १५ जानेवारीला, तर रथसप्तमी हा सण २८ जानेवारीला आहे. त्यामुळे या दिवसांत हळदी-कुंकवानिमित्त महिलांची धामधूम सुरू राहणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनाले