भाजप-शिवसेना यांचा सत्ता स्थापनेबाबत चा तिडा अजूनही सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातील चाललेला हा पोरखेळ पाहून महाराष्ट्रातली जनताही वैतागली आहे. हा तिढा सुटेना मला मुख्यमंत्री करा अशी मागणी बीड मधील एका शेतकऱ्याच्या मुलाने राज्यपालांना केली आहे. या शेतकऱ्यांच्या मुलाचे पत्र समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. श्रीकांत विष्णू गोदळे असे या भूमी पुत्राचे नाव आहे. श्रीकांत हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दहिफळ येथे राहतात. यांचे असे विधान येण्यामागे तसे कारणही आहे कारण ते अनेक वर्षापासून राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रात सतत चालू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. बळीराजा चिंतेत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपमधील मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेपर्यंत मला मुख्यमंत्री करण्यात यावे राज्यातील जनतेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात यावा असे श्रीकांत गदळे यांनी या पत्रात म्हटले आहे.