‘मला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज’ राज ठाकरे.

सगळेच सत्तेत जाऊन बसले तर तुमच्याबद्दल कोण बोलणार? तुमचा आवाज उठवण्यासाठी मला विरोध पक्षाच्या भूमिकेतून जायचं आहे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. यवतमाळमधील वणीत प्रचारसभे दरम्यान ते बोलत होते.
काय म्हणाले राज ठाकरे .
● गेली पाच वर्ष आणि त्याआधी सत्तेत येताना भाजपा-शिवसेना युती तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीच्या हातून महाराष्ट्र का गेला हे समजून घ्यायची गरज आहे.
● काँग्रेसच्या चुकीच्या कारभारामुळे भाजपा सत्तेत आली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारमुळे भाजपा-सेनेला मदत झाली.
● माझी माणसं आत पाठवलीत तर तुमचा आवाज आत जाईल. सध्या राज्यात आणि केंद्रात विरोध पक्षाची भूमिकाच महत्त्वाची आहे.
● जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा अशी इच्छा आहे. तितकी आपल्याकडे ताकद आहे, सक्षम तरुण-तरुणी आहेत.
गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे देखील त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या जनता दरबारातील या मागणीला कितपत दुजोरा मिळेल हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा