मला हवामान बदलाची चिंता वाटते : डोनाल्ड ट्रम

नवी दिल्ली (वृत्त संस्था): भारत, चीन व रशिया हे देश मोठया प्रमाणात उत्सर्जनातून हवेचे प्रदूषण करीत आहेत. त्यांचे औद्योगिक प्रकल्प व कचरा डेपोतून सागरात सोडण्यात येणारा कचरा आमच्यापर्यंत येत आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

हवामान बदल हा अत्यंत गुंतागुंतीचा प्रश्न असल्याचे सांगून ते म्हणाले की, मी पर्यावरणवादीच आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हवामान बदलाची मला चिंता वाटते, मलाही स्वच्छ हवा व पाणी हवं आहे. न्यूयॉर्क येथील इकॉनॉमिक क्लबच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ट्रम्प पुढे म्हणाले की, ‘पॅरिस हवामान करार हा एकतर्फी, भयानक व आर्थिकदृष्ट्या एकांगी होता. जर हा करार झाला असता तर त्यामुळे अमेरिकेतील उद्योग तीन वर्षांतच बंद पडले असते.

ऊर्जेसाठी खणन काम करू नका, कुठेही खणू नका, असे बंधन त्याच्यामध्ये होते. अमेरिकेसाठी तो करार भयानक होता. त्यामुळे अमेरिकेचं लाखो कोटी डॉलर्सचे नुकसान झाले असते. २०३० पर्यंत चीनने प्रदूषणावर काही उपाय करणे त्यात अपेक्षित नव्हते. रशियालाही त्यात काही बंधने नव्हती. प्रदूषण निवारणासाठी अमेरिकेनेच भारताला पैसे द्यावेत, असे अपेक्षित होते.

भारत विकसनशील देशाच्या नावाखाली अशा सवलती मागत असेल तर आम्हीही विकसनशील देश आहोत,असे यावेळी ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिका हा जमिनीचा लहान तुकडा आहे. तुलनेने चीन, भारत, रशिया हे देश प्रदूषण रोखण्यासाठी काहीही करीत नाहीत. मग आमच्या देशाकडून अपेक्षा करणे गैर आहे. ते आमच्या देशाबाबत बोलतात मग आम्ही त्यांच्या विषयी का बोलू नये. आम्ही विमाने बाळगू नयेत, गायी बाळगू नयेत असे त्यांना अपेक्षित आहे. चीनचे काय, असा प्रश्न उरतो.’ अशा प्रकारे प्रदूषण नियंत्रण करण्याबाबत विचार अमेरिकेच्या अध्यक्षांनी मांडलेले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा