मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका : राज ठाकरे

मुंबई : मुंबईत रंगशारदा येथे सोमवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना ‘मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान फक्त बाळासाहेबांचा आहे’, अशी ताकीद दिली.
९ फेब्रुवारीला मनसेने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मोर्चा भव्य होईल, या उद्देशाने तयारीला लागण्याच्या सूचना राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मोर्चात काही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली.
मनसेच्या नव्या झेंड्याचा अर्थात शिवरायांची राजमुद्रा असलेल्या झेंड्याचा अनादर होणार नाही याची दक्षता घेण्याचेही आदेश राज यांनी दिले आहेत.
राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याने ते बैठकीतून अवघ्या १० मिनिटांत निघून गेले. त्यानंतर पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनी बैठकीला संबोधित केल्याचे समजते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा