गोल पोस्ट स्पॉटलाइट मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं लवकरच होणार लग्न? केला मोठा खुलासा

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं लवकरच होणार लग्न? केला मोठा खुलासा

पुणे, ११ नोव्हेंबर २०२२ : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची जोडी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. दोघेही बराच काळापासून रिलेशनशिप मध्ये आहेत. आता या नात्याला नवीन नाव देण्याचा विचार दोघंही करत आहेत. दोघं वेकेशन ते बी टाऊनच्या पार्टीजपर्यंत कायम एकत्र दिसतात.

अर्जुन आणि मलायका कधी लग्न करणार या प्रश्नावर दोघंही कायम मौन बाळगतात. पण मलायका अरोराच्या नवीन इंस्टाग्राम पोस्ट ने चाहत्यांना आश्चर्यचकित केलंय. या पोस्ट मध्ये मलायका ने स्वतःचा लाजतानाचा फोटो शेयर करत त्या फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहलं आहे.. i said yes ….. या पोस्ट मुळं मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार आहेत का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. आता मलायका नेमकं कशासाठी हो म्हणाली हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्या आधीच चाहत्यांनी आणि कलाकारांनी तिला शुभेच्छा द्यायला सुरवात केली आहे.

पण मलायका आरोराने लगेच दुसरी पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं कि तिने अर्जुन कपूर साठी नाही तर तिच्या आगामी शो ‘मूव्हिग इन विथ मलायका’ साठी मी होय म्हणाली आहे. त्यामुळं मलायकानं सर्व अटकळांना पूर्णविराम दिलाय. ‘मुव्हींग विथ मलायका’ ही वेब सिरीज डिजनी प्लस हॉटस्टार वर ५ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version