मलालावरही येणार बायोपिक

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचे पीकची क्रेज जोरात सुरु आहे. त्यात बॉलिवूडमध्ये आता नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझाईच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्यात येणार आहे असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
मलाला युसूफझाई हिला लहानपणापासून मुलींच्या शिक्षणाबाबत आस्था होती. तसेच बीबीसीवर ती ‘गुल मकई’ या नावाने उर्दू ब्लॉग लिहीत असे. तालिबानी राजवटीला या ब्लॉगच्या माध्यमातून विरोध केल्यामुळे तिच्यावर ती शाळेत जात असताना तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात ती गंभीर जखमी झाली होती.
त्यानंतर तिच्या कुटुंबाने ब्रिटनमध्ये आश्रय घेतला. तरीही तिने मुलींच्या शिक्षणासाठी व हक्कासाठी मोठा लढा दिला.
या चित्रपटाचे नाव ‘ गुल मकई’ असे असून जयंतीलाल गाढा यांच्या पेन व टेक्नो फिल्म्सकडून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री रिम शेख मलालाची भूमिका साकारणार असून या चित्रपटात दिव्या दत्ता, अतुल कुलकर्णी, मुकेश ऋषी आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत . चित्रपटाचे दिग्दर्शन एच.ए. अमजदखान करणार आहेत.
दरम्यान, हा चित्रपट ३१जानेवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा