मल्याळम चित्रपट ‘जलीकट्टू’ ला मिळाली ऑस्कर मध्ये एन्ट्री, २७ चित्रपटांना टाकले मागे

7

नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर २०२०: चित्रपट हॉलिवूडचा असो किंवा बॉलिवूडचा असो, ऑस्कर पुरस्कार सर्वांनाच महत्त्वाचा आहे. चित्रपटासाठी ऑस्कर मिळविणे हे केवळ त्या चित्रपटासाठी मोठे नसते तर तो चित्रपट कायमस्वरूपी लोकांच्या आठवणीत राहणारा असतो. यावेळी हिंदीऐवजी मल्याळम चित्रपटाला ही संधी मिळाली आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेली फिल्म जलीकट्टू ऑस्करमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

जल्लीकट्टूचे दिग्दर्शन लीजो जोस पेल्लिसेरी यांनी केले आहे. ऑस्करसाठी नामांकन होण्यापूर्वी टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही हा चित्रपट दाखविण्यात आला होता. त्यावेळीसुद्धा या चित्रपटाचे खूप कौतुक झाले होते. चित्रपटाच्या कथेपासून ते दिग्दर्शनापर्यंत प्रत्येक बाबी चांगल्या प्रकारे आवडल्या. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रकारच्या भावना उफाळून निघाल्या. आता जलीकट्टू ला सुद्धा ऑस्करमध्ये स्थान मिळणार आहे, त्यामागे देखील एक खास कारण आहे.

चित्रपटात खास काय आहे?

असे म्हटले जात आहे की, जल्लीकट्टूच्या थीमने जूरी वर प्रभाव टाकला होता. चित्रपटात असे दिसून आले आहे की माणसे अनेक प्रकारे प्राण्यांपेक्षा वाईट आहेत. प्रत्येक पात्रे प्रेक्षकांशी जोडली गेली आणि चित्रपटातून संदेश देखील प्रभावीपणे देण्यात आला आहे. याच कारणास्तव या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले आहे. पण हा मार्ग देखील चित्रपटासाठी इतका सोपा नव्हता.

जलीकट्टू चित्रपटाने २७ चित्रपटांना मागे ठेवून नामांकनात प्रवेश केला

भारतामधून २७ चित्रपट ऑस्करला जाण्यासाठी ठेवण्यात आले होते. या यादीमध्ये छलांग, स्काई इज पिंक, गुलाबो सिताबो सारख्या चित्रपटांचा देखील समावेश होता. पण आता जल्लीकट्टू चित्रपट भारताच प्रतिनिधित्व करणार आहे, तेव्हा प्रत्येकजण निर्मात्यांना शुभेच्छा देत आहे. सर्वांना आशा आहे की, हा चित्रपट देशाच्या नावात भर घालणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा