मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दरबारी ‘मल्हार युग’चा जयजयकार

20
Cheers to the 'Malhar Era
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दरबारी 'मल्हार युग'चा जयजयकार

Cheers to the ‘Malhar Era : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रालयात एका अनोख्या भेटीचे स्वागत केले. प्रसिद्ध लेखिका डॉ.आम्रपाली कोकरे यांनी त्यांच्या ‘मल्हार युग’ या पुस्तकाची प्रत मुख्यमंत्र्यांना भेट दिली आणि त्याचा राज्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याची विनंती केली.

‘मल्हार युग’ हे पुस्तक महान मराठा योद्धा सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकते. डॉ. कोकरे यांच्या मते, या पुस्तकातील विचार महाराष्ट्राच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरतील. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांना मल्हारराव होळकर यांच्या विचारांशी जोडण्याचे महत्त्व यावेळी पटवून दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. कोकरे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि या विषयावर सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला सूचना देण्याचे आश्वासन दिले.

डॉ. कोकरे यांना नुकताच फलटण शहरात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रतिष्ठित राजमाता राणी अहिल्यादेवी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्या म्हणाल्या, “मल्हारराव होळकर यांनी स्त्रियांना समान वागणूक देण्याची सुरुवात केली. त्यांचे दातृत्व आणि कर्तृत्व अतुलनीय होते.”

न्यूज अनकट प्रतिनिधी,आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा