पुरंदर, १६ डिसेंबर २०२०: जेजुरी येथील मल्हार गडावर केलेली विद्युत रोषणाई आकर्षणाचा विषय ठरत आहे. रात्रीच्या वेळी उठून दिसणारी ही विद्युत रोषणाई पाहण्यासाठी अनेक नागरिक आवर्जून रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करून थांबत आहेत आणि हे आकर्षक दृष्य आपल्या डोळ्यात साठवत आहेत.
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या गडावर चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे. या उत्सवात अनेक धार्मिक विधी, पूजा अर्चा होत असतात, तसेच या उत्सव दरम्यान गडावर केली जाणारी विद्युत रोषणाई ही सुध्दा आकर्षणाचा विषय ठरत असते. रात्रीच्या वेळी दिसणारी ही आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी अनेक भाविक जेजुरीत येत असतात.
यावर्षी कोरोनामुळें असलेल्या निर्बंधामुळं भाविकांना जेजुरीत येऊन ही रोषणाई पाहता येणार नाही. मात्र, स्थानिक नागरिक या रोषणाईचा आनंद घेत आहेत. दर वर्षी अशा प्रकारची रोषणाई केली जाते. यावर्षी सुद्धा ही रोषणाई आकर्षक झाली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे.