गोल पोस्ट इतर मालिका बघण्यावरून नवरा बायकोत तुफान हाणामारी

मालिका बघण्यावरून नवरा बायकोत तुफान हाणामारी

पुणे : कात्रज येथील शिव शंभोनगर येथे नवरा बायकोमध्ये हाणामारीची घटना घटना आहे. बायको आवडीची मालिका पाहत होती. पतीने रिमोट मागितला. पण तिने दुर्लक्ष केले. त्यामुळे दोघांमध्ये वादविवाद झाला.

वाद टोकाला पोहोचला आणि नवऱ्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याने तिच्या हाताचा चावाही घेतला. त्यानंतर बायकोने थेट पोलिसांत नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. ३० वर्षीय बायकोने ३९ वर्षीय नवऱ्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याला अटकही करण्यात आली आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत असून शिवशंभो नगर येथे ही घटना घडली.

error: Content is protected !!
Exit mobile version