मॉल मुळे औंध मध्ये वाढल्या वाहतुकीच्या समस्या

पुणे, औंध: पुण्यातील औंध हा परिसर वेगाने विकसित होत आहे. स्मार्ट सिटीच्या योजनेअंतर्गत औंध मध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत. विकसित होत असलेल्या या भागांमध्ये अनेक सुपर मार्ट व मॉल उभारण्यात आली आहेत.

परंतु या सुपर मार्ट व मॉल मुळे येथे वाहतुकीच्या दळणवळणास अडथळा निर्माण होत आहे. अश्याच एका मॉल मुळे भर चौकात या वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. इतकेच नव्हे तर मॉलमध्ये येणारे नागरिक आपली वाहने फूटपाथ वर पार्किंग करत असल्याने पायी चालणाऱ्या लोकांना देखील याचा त्रास होत आहे.

औंध डी मार्ट ते वेस्ट एंड मॉल पर्यंत पूर्ण रस्ता ट्रॅफिक मुळे जाम झालेला असतो. मध्येच मॅकडोनल्ड असल्यामुळे तेथेही बरीच वाहने रोडवर लावलेली असतात. रस्त्यांच्या वळणावरच हे मार्ट व मॉल असल्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो. या समस्येची दखल घेत पोलिसांनी येथे कारवाई करत बरीचशी वाहने जप्त केल्याचे निदर्शनास आले. पोलीस अधिकाऱ्यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘पार्किंगची व्यवस्था करणे ही संबंधित मॉलची जबाबदारी आहे. येणाऱ्या ग्राहकांसाठी मुबलक पार्किंगची व्यवस्था करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. तथापि वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यास आम्ही अशा अनधिकृत पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करत राहू.’

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा