मल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

3

नवी दिल्ली : २६ ऑक्टोबर २०२२: सोनिया गांधी यांनी आज औपचारिकपणे काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपवला. या कार्यक्रमाला राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह सर्व नेते उपस्थित आहेत.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी खर्गे यांनी राजघाट इथे महात्मा गांधी, शांती वन इथे जवाहरलाल नेहरू आणि शक्तीस्थळ इथे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना वीरभूमी इथे जाऊन आदरांजली वाहिली.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या, अध्यक्षपदी निवडून आलेले हे अनुभवी आणि तळमळीचे नेते आहेत. आपल्या मेहनतीने आणि पक्षासाठी झोकून देऊन ते इथपर्यंत पोहोचले आहेत.

भार हलका झाला!

पुढे त्या म्हणाल्या की, काँग्रेसने आपला नवा अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला आहे. मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक एकजुटीने येणार्‍या आव्हानांवर मात करेल. तसेच खर्गे पक्षाचे अध्यक्ष झाल्याने भार हलका झाला असून, मी जबाबदारीतून मुक्त होत आहे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावर सोनिया गांधी यांना थांबवत, आता तुम्ही आराम करा, पण आम्ही वेळोवेळी तुमचे मार्गदर्शन घेऊ, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा