केसनंद: दि. ३० नोव्हेंबर २०२० गावठी बनावटीचे पिस्तोल बाळगल्याप्रकरणी केसनंद येथील एकास लोणीकंद पोलिसांनी केली अटक व त्याच्याकडून पिस्तोल जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा हत्यारांची शोध मोहीम घेत असताना लोणीकंद पोलीस ठाणेकडील तपास पथकातील समिर पिलाणे व दत्ता काळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे केसनंद गाव येथे सापळा रचून विकास हरगुडे यास ताब्यात घेतले आहे.
त्याचेकडून ४० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तोल मॅगजीनसह जप्त करण्यात आले आहे. व सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, समिर पिलाणे, दत्ता काळे, नाथा जगताप, उमेश गायकवाड, ऋषीकेश व्यवहारे, संतोष मारकड, सुरज वळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर शिंदे