पुण्यात पादचारी महिलेचा विनयभंग करणारा अटकेत

पुणे, १२ जुलै २०२३: महापालिकेच्या बसस्टॉपजवळून निघालेल्या पादचारी महिलेचा ब्रिजखाली आल्यानंतर, अंधारात विनयभंग करुन पसार झालेल्या एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण तुकाराम घोडे (रा.वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली.

पीडित महिला काम संपवून ती बावधन येथे येण्यासाठी मनपा बसस्टॉपजवळ येथे आली होती. ती पायी चालत बावधन बसस्टॉपकडे जाण्यासाठी ब्रिजखालून जात असतानाच, समोरुन आलेल्या एका अनोळखी व्यक्तीनी त्यांच्यासमोर येऊन अश्लिल चाळे केले. तसेच त्यांचा विनयभंग केला आहे. क्षणभर घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला, त्या इसमाचा पाठलागदेखील केला. पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर महिलेने शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

याप्रकरणी गुन्हा नोंद करीत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यात कैद झालेल्या संशयिताची माहिती काढली. बातमीदारामार्फत संशयित आरोपी हा पुन्हा मनपा परिसरात आल्याची माहिती मिळाली. लागलीच पथकाने त्याला पकडले. चौकशी केली असता त्यांने गुन्ह्यांची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रताप साळवे, मनीषा जाधव, पोलीस हवालदार रणजित फडतरे, बशीर सय्यद यांच्या पथकाने केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा