पुणे, ४ सप्टेंबर २०२३: पुण्यातील डेक्कन जिमखाना भागात व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एकास पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली असून, आंतराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीची किंमत पाच कोटी रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विश्वनाथ रतन गायकवाड (वय ३८, रा. खोपडेनगर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वन्यजीव कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर व्हेल माशाची उलटी त्याने कुठून आणली आणि कुणास विक्री करणार होता, याचा तपास पुणे पोलिस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : सिद्धेश शिगवण