मोहोळमध्ये सराईत गुन्हेगाराने रिव्हॉल्व्हरमधून झाडल्या हवेत गोळ्या, गुन्हा दाखल

57

मोहोळ, सोलापूर ७ जानेवारी २०२५ : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोळीबार, हल्ले, कोयता गँगची दहशत, महिलांवरील अत्याचार अशा घटना समोर येत आहेत. अशातच सोलापूर मधील मोहोळ तालुक्यात एका सराईताने दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी प्रशांत भोसले या सराईत गुन्हेगाराला अटक केलीय.

न्युज अनकट प्रतिनीधी : भाग्यश्री शिंदे