पुणे, २८ फेब्रुवारी २०२३: जगातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ चे होस्ट अॅडव्हेंचरर बेअर ग्रिल्स यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचं एक छायाचित्र शेअर केलंय, जे ते पाहत असताना हा फोटो त्याच्या ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स अँड पीएम मोदी’ या शो मधील आहे. जो २०१९ मध्ये शूट झाला होता. नेटिझन्स ट्विटरवर शोच्या थ्रोबॅकबद्दल बरीच चर्चा करत आहेत.
बेअर ग्रिल्सने सोमवारी ट्विटरवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि लिहिलं, ‘रेन फॉरेस्टमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या साहसाच्या मजेदार आठवणी.’ त्याने आपल्या चाहत्यांना सांगितलं की, जंगलाचा अनुभव नेहमीच आश्चर्यकारक असतो. यासोबतच त्यांनी खुलासा केला की, पंतप्रधान मोदींसोबत ज्या राफ्टमध्ये ते नदी ओलांडत होते, त्या तराफातून प्रत्यक्षात गळती होत होती. शो दरम्यान, पीएम मोदींनी बेअर ग्रिल्सला सांगितलं होतं की त्यांनी त्यांच्या १८ वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदा सुट्टी घेतली आहे.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये पंतप्रधान मोदींसोबतचा साहसी बेअर ग्रिल्सचा शो शूट करण्यात आला. त्याच वर्षी १२ ऑगस्ट रोजी हा शो टीव्हीवर प्रसारित झाला होता. मॅन व्हर्सेस वाइल्डचा हा एपिसोड भारतासह १८० देशांमध्ये पाहायला मिळाला. लोकांनी या एपिसोडचे खूप कौतुक केलं. बेअर ग्रिल्सने दावा केला की हा भाग ३.६ अब्ज सामाजिक प्रभावांसह ‘जगातील सर्वात ट्रेंडिंग टेलिव्हिजन कार्यक्रम’ बनला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड