अमेरिका, १० ऑगस्ट २०२३ : अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांना जीवे मारण्याची धमकी देणारा FBI च्या कारवाईत ठार झाला आहे. मयत आरोपी हा अमेरिकेच्या यूटा येथील राहणारा होता. बायडेन हे यूटा येथील दौऱ्यावर येणार होते. त्यापूर्वी काही तास आधी FBI ने आरोपींच्या ठीकाणावर छापेमारी केली. नंतर सुरक्षा एजन्सीच्या कारवाईत तो मारला गेला आहे.
FBI ने आरोपींच्या मृत्यूंची पुष्ठी केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या विशेष एजंट्जनी आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने आक्रमकपणे विरोध केला. त्यामुळे कारवाई दरम्यान तो ठार झाला. सुरक्षा एजन्सीजने आरोपींची ओळख जाहीर केलेली नाही. माध्यमांच्या माहितीनुसार, यूटाच्या संघीय अभियोजकने जी तक्रार नोंदवली आहे, त्यात आरोपीचे नाव क्रेग राॅबर्टसन, असे ठेवण्यात आले आहे.
आरोपींनी सोशल मीडिया पोस्ट टाकून बायडेन यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या पोस्टमध्ये आरोपीने लिहिले होते की, बायडेन यूटा येथे येत असल्याचे मी ऐकले आहे. मला माझी एम २४ स्नाइपर रायफल वरील धूळ साफ करायची आहे. विदुषकांच्या प्रमुखांचे स्वागत आहे, अशी उपहासात्मक टोलेबाजी करत आरोपीने सोशल मीडिया पोस्ट टाकली होती.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर