मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण

18

मुंबई : मुंबई येथील गोरेगाव येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं.
मनसेचं आज महाअधिवेशन पार पडणार असून याचे औचित्यसाधून राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे.
मनसेच्या नव्या झेंड्यात भगवा रंग असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. या झेंड्याचा फोटो काही दिवसांपूर्वी समोर आला होता. मात्र पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नव्हती. आज अखेर राज ठाकरे यांनी अधिकृतपणे नव्या झेंड्याचं अनावरण केलं.

याआधी मनसेने अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवला होता. तेव्हापासूनच मनसे झेंडा बदलणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र ट्विटरवर बदल केल्यानंतर तसे संकेत मिळाले होते.
या अगोदर पक्षाच्या आधीच्या झेंड्यात निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग दिसत होते. मात्र आता त्यात बदल करण्यात आला असून चार रंगांऐवजी फक्त एकच भगवा रंग आहे. तसेच या भगव्या रंगाच्या या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा छापण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा