मनसेच्या चेतावणी नंतर टी सिरीजने युट्युब वरून काढून टाकले अतिफ असलमचे गाणे

मुंबई, दि. २५ जून २०२० : बुधवारी टी-सीरिजने पाकिस्तानी गायक आतिफ असलम याचे गाणे आपल्या यूट्यूब वाहिनीवरून काढून टाकले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या राजकीय पक्षाच्या विरोधानंतर संगीत कंपनीने हा निर्णय घेतला आहे. शनिवारी टी-सीरिजने आपल्या यूट्यूब वाहिनीवर ‘मरजावन’ या चित्रपटाच्या गाण्याच्या ‘किन्न सोना’ चे अतिफ असलम वर्जन अपलोड केले होते.

मात्र, यानंतर मनसेच्या चित्रपत सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रॉडक्शन हाऊसला हा व्हिडिओ न काढल्यास मोठी कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात टी-सिरीजने आपल्या स्पष्टीकरणात असे म्हटले आहे की हे गाणे युट्यूबवर चुकून अपलोड केले गेले होते.

पत्रानुसार टी-सीरिजने म्हटले आहे की, “आतिफ असलम यानी गायलेले गाणे आमच्या एका कर्मचार्‍याने चुकून युट्यूबवर अपलोड केले. त्याला त्याच्या या कृत्याबद्दल कल्पना आली. आपल्याकडून ही चूक झाली असल्याचे त्यांनी मान्य केले आहे व आम्ही याबाबत माफी देखील मागत आहोत.”

टी-सीरीज ने पुढे असे म्हटले आहे की, “आम्ही हे गाणे आमच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ देणार नाही याचे आम्ही आश्वासन देतो तसेच या गाण्याला आम्ही प्रमोट देखील करणार नाही. आम्ही असे आश्वासन देतो की आम्ही कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला असिस्ट करणार नाही किंवा कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराचे गाणे आमच्या प्लॅटफॉर्मवर ही येऊ देणार नाही. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसेने हे धोरण हाती घेतले आहे की, भारतामध्ये कोणत्याही पाकिस्तानी गायकाचे गाणे येता कामा नये किंवा कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला भारतातील गाणी गाण्यासाठी दिले न जावे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा