गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिकच्या नांदगाव बसस्थानकात बसमधील दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला, बस थेट नांदगाव...

नाशिकच्या नांदगाव बसस्थानकात बसमधील दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला, बस थेट नांदगाव पोलीस ठाण्यात

नांदगाव, नाशिक १८ नोव्हेंबर २०२३ : नाशिकच्या नांदगाव बसस्थानकात बसमधील दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याने सदर बस थेट नांदगाव पोलीस ठाण्यात नेऊन प्रवाशांची चौकशी करण्यात आली. दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरे झाल्यानंतर महिलांची पाऊले माहेरी तसेच सासरी वळतात. बाहेर गावी जाणाऱ्यांच्या गर्दीमुळे नांदगाव शहरातील बस स्थानक गजबजलेले होते. गर्दीचा ओघ दिवसभर कायम राहिल्याने नांदगाव बस स्थानकांमध्ये मोठी गर्दी होती. त्यावेळी हि घटना घडली.

बेबीबाई नागरे वय वर्षे ७० यांची ७ ग्रॅमची पोत-मंगळसुत्र आणि उशाबाई जाधव, वय वर्षे ४९ यांची सव्वा तोळे सोन्याची पोत-मंगळसूत्र हे नांदगाव बस स्थानकात नांदगाव -चाळीसगाव बस मध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दरम्यान चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही, अखेर त्यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात बस नेली.

पोलिसांनी तपास करत अज्ञात चोरट्यांवर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देत बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास सुरु केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version